शरद पवारांचा काँग्रेसला चिमटा; नाना पाटोले म्हणतात, “काँग्रेसने अनेकांना जमीन...”

शरद पवारांचा काँग्रेसला चिमटा; नाना पाटोले म्हणतात, “काँग्रेसने अनेकांना जमीन...”

मुंबई | Mumbai

काँग्रेस (Congress) पक्षाची अवस्था ही रया गेलेल्या जहागीरदारासारखी झाली आहे, असे विश्लेषण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. एका इंग्रजी साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी काँग्रेसच्या (Congress Party) स्थितीवर भाष्य केले. शरद पवार यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानामुळे (Sharad Pawar Statement About Congress) राजकीय वर्तुळात एकच खबळबळ उडाली असून, जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शरद पवारांच्या या विधानावर प्रतिक्रिया देत, अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसत आहे. (Nana Patole Reacted To Sharad Pawar Statement About Congress)

'शरद पवार मोठे आहेत, त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही असंच ठरलेलं आहे. परंतु, पक्षाबाबत त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे. खरंतर काँग्रेसने अनेक लोकांना जमीन राखायला दिलेली होती, जमीन राखणाऱ्या लोकांनीच जमीन चोरली, डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती आज झालेली असेल, असं त्यांचं मत असेल.' असं नाना पटोलेंनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटलेलं आहे.

तसेच, 'लोकशाहीमध्ये कोणाला काही बोलायचं असेल तर त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय बोलावं त्यांचा प्रश्न आहे. दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांबद्दलच्या प्रतिक्रिया देऊ नये. मात्र, अशा मोठ्या नेत्यांना आम्ही सांगू शकत नाही. कुणाच्या म्हणण्यानं काही होत नाही. काँग्रेसचा दबदबा आजही कायम आहे. लोकशाहीत लोक ठरवत असतात, कुण्या नेत्याच्या म्हणण्यानं काँग्रेस पक्षाला काही फरक पडत नाही. २०२४ मध्ये काँग्रेसचं सत्तेत येईल,' असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

दरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देत काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे. 'काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरं असूच शकत नाही. आत्ता काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगत आहे. वऱ्हाडात असं म्हणतात की मालगुजरी तर गेली, पण उरलेल्या मालावर आता गुजराण सुरू आहे. तशा प्रकारचं वक्तव्य पवार साहेबांनी केलंय. ते काँग्रेसवर चपखलपणे लागू होतंय,' असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com