शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय ठरलं?'इंडिया'ची बैठक कधी? नाना पटोले म्हणाले, ...

शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय ठरलं?'इंडिया'ची बैठक कधी? नाना पटोले म्हणाले, ...

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत (Meeting with Sharad Pawar) मुंबईत आज बैठक पार पडली. या भेटीत काय चर्चा होणार? लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार का? विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार? अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत नाना पटोले (Nana Patole) यांनी बैठकीत काय चर्चा झाली याची सविस्तर माहिती दिली.

या बैठकीबाबत सांगताना नाना पटोले म्हणाले, १५ ऑगस्टनंतर किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ची (INDIA) मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आम्ही आज (२८ जुलै) शरद पवार यांना भेटलो. विरोधी पक्षांच्या बैठकीचे आयोजन महाविकास आघाडी या करेल.

अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, नेते असे १०० हून अधिक नेते मुंबईत या बैठकीसाठी येणार आहेत. त्यामुळे याची पूर्व तयारी करावी लागणार आहे, त्यामुळे याला वेळ लागतो आहे. याआधी झालेल्या बंगळुरु इथल्या बैठकीचा अनुभव यावेळी त्यांनी सांगितला. तसेच महाराष्ट्रात मुंबईत होणाऱ्या बैठक व्यवस्थित पार पडेल असेही ते म्हणाले.

शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय ठरलं?'इंडिया'ची बैठक कधी? नाना पटोले म्हणाले, ...
राहुल कुल यांना क्लीनचीट मिळताच संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल ; म्हणाले...

दरम्यान, मुंबईत होणाऱ्या या बैठकीचे आयोजक उध्दव ठाकरे असणार आहे. याबाबत त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. यावेळी मविआतील प्रत्येक पक्षाची जबाबदारी काय असणार यावर चर्चा त्यांच्याशी चर्चा झाली. यासाठी पुढच्या शनिवारी सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान नाना पटोले म्हणाले, पुढच्या शनिवारी सकाळी ११ वाजता ‘इंडिया’च्या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी आम्ही पुन्हा एक बैठक घेणार आहोत. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री येतील, वेगवेगळ्या राज्यांमधील पक्षांचे नेते येतील.

शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय ठरलं?'इंडिया'ची बैठक कधी? नाना पटोले म्हणाले, ...
Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात गोन्साल्विस आणि फरेरा यांना दिलासा ; पाच वर्षानंतर 'या' अटींवर जामीन मंजूर

विधानसभेचा विरोधी पक्षनेता पुढील आठवड्यात ठरेल

यावेळी नाना पटोले यांना विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “विधी मंडळाची व्यवस्था असते, त्यामध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार विरोधात जास्त, त्याच पक्षाचा आमदार विरोधील पक्षनेता होता. काँग्रेस पक्षाचाच आमदार विरोधी पक्षनेता होणार आहे”, अशी प्रतिक्रिया दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com