Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामी हनुमान भक्त, पण बाऊ करत नाही; नाना पटोलेंचा राज ठाकरेंना टोला

मी हनुमान भक्त, पण बाऊ करत नाही; नाना पटोलेंचा राज ठाकरेंना टोला

मुंबई | Mumbai

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मशिदीवरील भोंगे (Loud Speaker) हटवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लाऊ असा इशारा दिला आहे. या इशाऱ्याचे परिणाम संपूर्ण देशभरात उमटत आहेत…..

- Advertisement -

आता काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही सर्वधर्म समभाव पाळतो. आमचा कोणत्या धर्माला विरोध नाही मात्र कोणीही त्याचा बाऊ करू नये, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला आहे.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात एकात्मता संपविण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे. राज ठाकरे हे केवळ कॉमेंट्री करत आहेत. महागाईवरून जनतेचे लक्ष बाजूला सारून मशीद आणि भोंगे असे विषय काढले जात आहेत.

हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचणे काही वाईट नाही. मीदेखील सकाळी घराबाहेर जाताना हनुमान चालिसा वाचूनच बाहेर पडतो. मात्र त्याचा बाऊ करत नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक व्हिडीओ मी दाखवला. त्या व्हिडीओत राज ठाकरे यांच्याबद्दलची फडणवीस यांची भूमिका सुपारीबाज अशी होती. त्यामुळे फडणवीसच मागच्या वेळी कोणाची सुपारी घेतली आणि आता कोणाची घेतली हे सांगतील. राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात असे फडणवीस यांचे म्हणणे आहे. ते मी व्हिडीओद्वारे दाखवले असल्याचे नाना पाटोले म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या