Monday, April 29, 2024
Homeराजकीयनाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

मुंबई | Mumbai

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारणात नाहीतर तर देशातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर माजी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदांचा धडाका लावला आहे. तसंच, अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुनही राज्य सरकारला घेरलं आहे.

दरम्यान एका आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे अशी टीका केली. तसंच काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं असंही म्हटलं. फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे.

नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाट्याचे सांगत असतील, तर फडणवीस सरकारमध्ये झालेली पापं राज्य सरकारने उघड करावीत. परमबीर सिंग कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती’, असा पलटवार नाना पटोले यांनी केला.

तसेच, ‘वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलं आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत’, असे नाना पटोले म्हणाले.

त्याचबरोबर, ‘मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांना निलंबित केलं असतं. मुंबईसारख्या संवेदनशील ठिकाणी या पद्दतीने वागणारे अधिकारी असतील तर मी बदली केली नसती निलंबितच केलं असतं. अधिकाऱ्यांनी कोणाची बाहुली बनू नये. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. फडणवीसांनी रश्मी शुक्लांचा उल्लेख केला. आता या पद्धतीच्या अधिकाऱ्यांचा वापर भाजप करत असेल तर ही गंभीर बाब आहे. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही,’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या