न.पा.सह स्थानिक स्वराज्य संस्था काबिज करण्याचे राष्ट्रवादीचे उदिष्ट

माजी आ. संतोष चौधरी : कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मा.आ. संतोष चौधरी सोबत जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र पाटील, युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, कृउबा सभापती सचिन चौधरी, नितीन धांडे, उल्हास पगारे आदी
बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मा.आ. संतोष चौधरी सोबत जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र पाटील, युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, कृउबा सभापती सचिन चौधरी, नितीन धांडे, उल्हास पगारे आदी

भुसावळ (प्रतिनिधी) bhusawal-

पक्षाच्या कार्याकर्त्यांला विश्‍वासात घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दि. १२ रोजी शहरातील रा.कॉ. परिसंवाद यात्रेच्या माध्यमातू शहरात मार्गदर्शन करणार आहेत . यावेळी पक्षाची मागील स्थिती व आगामी निवडणुकांबाबत आढावा घेणार आहे.

आगामी न.पा. निवडणुकांमध्ये त्या काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे ध्येय असणार आहे. त्यात वरणगाव पालिकेत संपूर्ण जागा राष्ट्रवादी जिंकेल तर भुसावळात भाजपाला दोन आकडे ही गाठता येणार नाही असा विश्‍वास व्यक्त केला. तसेच जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना बंद आहेत त्या सुरु झाल्यास ४० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

याबाबत प्रदेशाध्यक्षांकडे मागणी करणार आहे. ग्रा.पं.निवडणुकीत नाथाभाऊंचे फोटो लावून आता दुसर्‍याकडे फिरतात हे योग्य नाही ते असे लोक दोन्ही तबल्यांवर हात ठेवत आहे हे योग्य नसल्याचे सांगून तहसीलदारांनी तालुक्यातील कंडारी येथी अनुसुचीत जाती महिला आरक्षण असतांना त्यात घोळ करुन ते अनुसुुचित जातीसाठी राखिव केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे मागणी केली असून याबाबत न्यायालयात दाद मागितली जाईल असा ईशारा माजी आ. संतोष चौधरी यांनी दिला.

ते येथील तापीनगरातील त्यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परिसंवाद यात्रेनिमित्त १० रोजी आयोजित कार्यकर्ता, पदाधिकार्‍यांच्याबैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवक जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य रवींद्र पाटील, कृउबा सभापती सचिन चौधरी, महिला शहराध्यक्षा नंदा निकम, महिला तालुकाध्यक्ष सपना पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शहराध्यक्ष नितीन धांडे, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, सतीष घुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कृउबा सभापती सचिन चौधरी यांनी, यावेळी प्रदेशाध्यक्षांच्या स्वागताचे बॅनर्सला शहरात लावण्यासाठी पालिकेने परवाणगी दिलेली आहे. मात्र डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी बॅनर लावण्यासा गुन्हे दाखल करण्यात येईल असा दम राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना दिला असल्याचे सांगून. या प्रकाराबाबत जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील यांच्याकडे तक्रार केली. बैठकीत, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, महिला जिल्हाध्याक्ष कल्पना पाटील यांनी यावेळी कार्यकर्ते पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी शहर व तालुका पदाधिकार्‍यांची कार्यकारणी जाहीर करुन नियुक्तिपत्र देण्यात आले. सुत्रसंचालन वाय. आर. पाटील यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com