Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानगर - शिवसेनेतंर्गत गटबाजीचे ग्रहण अखेर सुटले !

नगर – शिवसेनेतंर्गत गटबाजीचे ग्रहण अखेर सुटले !

अहमदनगर (प्रतिनिधी) –

मुंबईतून कानउघाडणी होताच शहर नगर शिवसेना पदाधिकारी-नगरसेवकांनी ‘झाले गेले विसरून जावे…’चा सूर आळवित एकीचा नारा दिला. गटबाजी संपुष्टात आल्याचे जाहीर करत येथून पुढे नेता सुभाष चौकातील शिवालयातूनच एक सूर एक ताल निघेल, असा दावा करत शिवसैनिकांनी आज गुरुवारी नगरकरांना एकीचे दर्शन घडविले.

- Advertisement -

तासभरात मनोमिलन

पुढच्या आठवड्यात सभासद नोंदणीसंदर्भात बैठक होईल. संघटनवाढीसाठी एकदिलाने काम करावे. काही अडचणी आल्यास मंत्री शंकरराव गडाख, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्याशी थेट संपर्क करावा. बैठकीत संपर्कप्रमुख कोरगावकर, जिल्हा प्रमुख प्रा. गाडे आणि विक्रम राठोड या तिघांनीच मनोगत व्यक्त केले. तासभरात मनोमिलन होऊन बैठकही संपली.

पत्रकबाजाला घरचा रस्ता

कोणीही कोणाविरोधात पत्रक काढायाचे नाही. वृत्तपत्राच्या संपादकांना जिल्हा प्रमुख पत्र देणार असून नावानिशी बातमी छापण्याचे आवाहन केले जाणार आहे. पत्रक काढणार्‍याची गय केली जाणार नाही. पक्ष विरोधात बोलणार्‍याला थेट घरचा रस्ता दाखविला जाईल असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला. सोशल मिडिया आणि वृत्तपत्रातील बातम्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत एक खास टीम कार्यरत होणार आहे. त्यामुळे कोणी आक्षेपार्ह पोस्ट, पत्रक टाकू नये असे आवाहन संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केले.

शिवालय श्रद्धास्थान..

चितळे रोडवरील ‘शिवालय’ हे श्रध्दास्थान मानून तेथूनच शहर शिवसेनेचे कार्यक्रम निश्चित होऊन सुरूवात केली जाणार आहे. आपसातील भेदभाव, हेवेदावे विसरून सगळ्यांनी एकत्र येण्याला या बैठकीत संमती दर्शविली. स्व. राठोड यांना अभिप्रेत असलेली शिवसेना नगरकरांना दिसेल असे सांगत आता एकच आवाज निघेल असा निर्णय सावेडीतील आजच्या बैठकीत झाला.

आजचे मनोमिलन कायमस्वरूपाचे आहे. यात कोणी मिठाचा खडा टाकला तर त्याला बाहेर काढले जाईल. पक्षात शिस्त महत्त्वाची. स्वबळावर सत्ता मिळवून शिवसेनेचा महापौर करणार त्यासाठी सगळ्यांची साथ महत्त्वाची आहे.

प्रा. शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख.

वादाला आता पूर्णविराम. यापुढे उद्गारचिन्ह नाही. फक्त आणि फक्त शिवसेना. आता शिवसेनेचाच महापौर दिसेल. त्यासाठी कोणीशीही दुश्मनी घेण्याची तयारी आहे. यापुढचे निर्णय मुंबईतूनच होतील.

भाऊ कोरगावकर, संपर्कप्रमुख.

- Advertisment -

ताज्या बातम्या