Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामहाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण; काय म्हणताय सत्ताधारी आणि विरोधक?, वाचा

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण; काय म्हणताय सत्ताधारी आणि विरोधक?, वाचा

मुंबई l Mumbai

राज्यातील शिवसेना (shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि काँग्रेसच्या (congress) महाविकास आघाडी सरकारला (mva govt) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तान सत्ताधारी व विरोधकांकडून सरकारच्या कामाचे विश्लेषण सुरू झाले आहे. जाणून घेऊयात सत्ताधारी आणि विरोधक नेमकं काय म्हणताय…

- Advertisement -

राज्य सरकार खंबीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एका पत्राद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. या पत्रातून मुख्यमंत्र्यांनी राज्यावर ओढवलेली… ओढवणाऱ्या संकटाचा उल्लेख करत त्यांना तोंड देण्यासाठी राज्य सरकार खंबीर असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

तर मी त्याविषयी कसं बोलणार? – देवेंद्र फडणवीस

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘जिथं कामगिरी असते तिथं मूल्यमापन केलं जातं, या सरकारने काही कामच केलेलं नाही तर मी त्याविषयी कसं बोलणार?’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं.

महाविकास आघाडी सरकार भक्कम – अजित पवार

“महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांच्या कारकिर्दीत राज्यासमोरच्या प्रत्येक आव्हानावर यशस्वी मात केली. जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निष्ठापूर्वक, प्रामाणिक प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे, असा दावा राज्याच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या कल्याणासाठी सर्वांना सोबत घेऊन यापुढेही निष्ठेने काम करीत राहील. दोन वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानतो आणि सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देतो,” अशा शब्दात पवार यांनी शनिवारी महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त सर्वांचे आभार मानले. तसेच या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत.

सर्वच आघाड्यांवर अपयशी आघाडी सरकार – चंद्रकांत पाटील

”भाजपाचा विश्वासघात आणि जनादेशाचा अपमान करून राज्यात २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. दोन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने राज्यातील शेतकरी, महिला, मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती – जमाती, युवा,विद्यार्थी, कामगार अशा विविध घटकांची फसवणूक केली आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ताधारी महाविकास आघाडी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरली आहे.” अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

बाते कम, काम ज्यादा – नवाब मलिक

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारचा लेखाजोखा मांडला आहे. यावेळी बाते कम, काम ज्यादा, हेच आमच्या सरकारचं धोरण आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारचा लेखाजोखा मांडतानाच भाजपवर निशाणा साधला. दोन वर्षापूर्वी आघाडीचं सरकार स्थापन झालं. आजच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह पाच मंत्र्यांनी शिवतीर्थावर शपथ घेतली. त्या दिवसापासून जनतेला न्याय देणं आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचा दृष्टीकोण आम्ही ठेवला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मिती आपत्ती निर्माण झाल्यावरही आमच्या सरकारने यशस्वीपणे परिस्थिती हाताळली आहे, असं मलिक यांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या