मिशन नाशिक मनपा : महिलांचा सर्वांगीण विकास; समाजवादी पार्टीचे ध्येय

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | फारुख पठाण Nashik

उत्तर प्रदेशच्या समाजवादी पार्टीच्या (Samajvadi Party ) ज्येष्ठ नेत्या डिंपल यादव (Dimpal Yadav )यांनी एक नारी सबके भारी अशी घोषणा केली आहे. याप्रमाणे समाजवादी पार्टी नाशिक महिला आघाडीच्या वतीने काम होणार आहे, अशी माहिती समाजवादी पार्टी नाशिकच्या महिला विधानसभा अध्यक्ष निलोफर आजाद यांनी सांगितले आहे.

नारी शक्तीच्या जोरावर आगामी नाशिक महापालिका निवडणूकीच्या NMC Election मैदानात समाजवादी पार्टी उतरणार आहे, नाशिक महापालिकेत यापूर्वी समाजवादी पक्षाच्या वतीने शेख सलीम अब्बास व नगरसेवक मुशीर सय्यद यांनी नेतृत्व केले आहे. नाशिक शहर अध्यक्ष इम्रान चौधरी, जिल्हा अध्यक्ष रफिक सय्यद यांच्यासह प्रदेश सचिव रमजान सिद्दीकी तसेच पक्षाचे सर्व आघाडीचे पदाधिकारी तसेच समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते आगामी महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागले आहे .

नाशिक मधील उत्तर भारतीय तसेच अल्पसंख्याक समाजाचे ज्या ठिकाणी प्राबल्य आहे अशा ठिकाणी समाजवादी पक्षाच्या वतीने चांगले सुशिक्षित उमेदवार देण्यात येणार आहे. यामध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त महिलांना देखील संधी देण्यात येणार आहे. दरम्यान सध्या महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस त्याचप्रमाणे समाजवादी पार्टी यांच्या महाविकास आघाडीची सत्ता असल्याने आम्ही महाविकास आघाडी व्हावी तसेच सेक्युलर मतांचे विभाजन होऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहे.

वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा देखील सुरू असून नाशिक महापालिकेतील भारतीय जनता पक्षाची सत्ता बदलण्यासाठी नियोजन करीत असल्याचे आझाद यांनी सांगितले. महिलांचा सर्वांगीण विकास, शिक्षा, आरोग्य तसेच रोजगार या विषयांना घेऊन आम्ही महापालिका निवडणुकीत उतरणार आहोत. असे त्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *