संजय राऊतांचा सुटकेचा मार्ग मोकळा; PMLA कोर्टाने ED ची जामीन स्थगितीची मागणी फेटाळली

संजय राऊतांचा सुटकेचा मार्ग मोकळा; PMLA कोर्टाने ED ची जामीन स्थगितीची मागणी फेटाळली

मुंबई | Mumbai

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Redevelopment Scam) १०० दिवस तुरूंगात असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज (९ नोव्हेंबर) मुंबई सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे.

संजय राऊत यांच्यासोबत प्रविण राऊत (Pravin Raut) यांनाही जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत आजच जेलबाहेर पडणार आहेत. २ लाखांच्या जामीनावर त्यांची सुटका झाली आहे.

दरम्यान संजय राऊत तुरुंगातून बाहेर येणार, हे आता स्पष्ट झालं आहे. पीएमएलए न्यायालायने राऊत यांच्या जामीनावर स्थगिती देण्याची ईडीची मागणीही फेटाळून लावली आहे. आज संध्याकाळपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाल्यास राऊत आजचं बाहेर येऊ शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला ईडी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com