खडसे-पवारांच्या ‘न’ झालेल्या भेटीचे ‘गुर्‍हाळ’

माझ्या संदर्भातील बातम्या देखील मला माध्यमांतूनच कळतात -खडसे
खडसे-पवारांच्या ‘न’ झालेल्या भेटीचे ‘गुर्‍हाळ’

मुंबई - Mumbai :

भाजपाचेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत असतानाच बुधवारी मुंबई येथे शरद पवार व खडसे यांची भेट होणार असल्याची चर्चा दिवसभर राज्यात सुरु होती. मात्र अशी कोणतीही भेट झाली नसल्याची माहिती पवार व खडसे या दोघांकडून देण्यात आली आहे.

एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच बुधवारी खडसे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.मात्र यासंदर्भात खडसे यांनी आपण पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईत आलो असल्याचे सांगत भेटी विषयी बोलणे टाळले .तसेच शरद पवार यांनीही खडसे यांच्या भेटी संदर्भात सुरु असलेल्या चर्चेला काहीही अर्थ नसल्याचे स्पष्ट केले.

आपल्याला पक्षाकडून अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत खडसे गेल्या काही दिवसांपासून भाजप नेतृत्वावर टीका करत आहेत. त्यांनी अलीकडे आपल्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे.गेल्या पंधरवड्यात मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी खडसेंना प्रवेश देण्याबाबत आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांसोबत चाचपणी देखील केली होती. त्यात स्थानिक नेत्यांनी मते मांडत खडसेंबाबत पक्षाला फायदाच होण्यार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादीत खडसेंच्या प्रवेशाबाबत अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात देखील खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेनंतर मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com