राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? न्यायालयाने बजावली नोटीस

राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? न्यायालयाने बजावली नोटीस

मुंबई | Mumbai

आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) राणा दाम्पत्याला नोटीस बजावली असून अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये? याविषयी त्यांचे म्हणणे मागितले आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पताला जामीन मंजूर केला होता, त्यावेळी न्यायालयाने काही अटीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या अटीचे उल्लंघन झाल्याचे सरकारी वकीलांचे म्हणणे आहे. त्यावरून मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. जामीन रद्द करण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश न्यायालयाने दिलेले नाहीत.

न्यायालयाने राणा दाम्पत्याला कोणत्या अटी घातल्या होत्या?

प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही, पोलिस तपासात अडथळे आणायचे नाहीत, घटनेशी संबंधित साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव आणायचा नाही आणि त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही आणि पुन्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभाग घ्यायचा नाही, अशा अटी घालत राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला होता.

Related Stories

No stories found.