राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या! मुंबई पोलिसांची पुन्हा नोटीस

८ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश
राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या! मुंबई पोलिसांची पुन्हा नोटीस

मुंबई | Mumbai

आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे.

राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. राणा दाम्पत्याविरोधात सत्र न्यायालयात दोषारोपत्र सादर करण्यात येणार आहे. यासाठी ८ जून रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश या नोटिशीतून देण्यात आलं आहे.

दरम्यान, यापूर्वी राणा दाम्पत्यानं महाविकास आघाडी सरकारसोबतच (MVA GOvt) मुंबई पोलिसांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. राणा दाम्पत्यानं कोठडी आणि लॉकअपमध्ये असभ्य वागणूक दिल्याबद्दल पोलिसांवर विविध आरोप केले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com