धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या 'त्या' महिलेला अटक

दोन दिवसांची पोलीस कोठडी
धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या 'त्या' महिलेला अटक

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) इंदूर येथून अटक केली आहे. आरोपी महिलेचे नाव रेणू शर्मा (Renu Sharma) असे आहे.

या महिलेने फोनच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल करु, अशी धमकी दिली होती. धनंजय मुंडे यांना मिळालेल्या या धमकीनंतर त्यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल केली होती.

मुंबई पोलिसांनी रेणू शर्मा हिला मुंबईत आणल्यानंतर न्यायदंडाधिकारी न्यायालयात (Court) हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने रेणू शर्मा हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली. यादरम्यान पोलीस रेणू शर्माची चौकशी करतील. या चौकशीत कोणते नवीन खुलासे होतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा (Karuna Sharma-Munde) यांनी देखील आरोप केले होते. मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर देखील मुंडेंवर गंभीर आरोप केले होते.

Related Stories

No stories found.