Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याचर्चा तर होणारच! छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

चर्चा तर होणारच! छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई l Mumbai

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA Govt) वर टीका करत असतात. तर सत्ताधारी विरोधकांचे आरोप खोडून काढत असतात.

- Advertisement -

दरम्यान आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या (Obc Reservation) मुद्द्यावर चर्चा झाली.

Maratha Reservation : …अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू; संभाजीराजेंचा इशारा

या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याचं कळतंय. ओबीसींच्या विविध प्रश्नांवर यावेळ सकारात्मक चर्चा झाली. भुजबळ यांनी फोटो पोस्ट करत या भेटीची माहिती दिली आहे. ‘आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ‘ओबीसीं’च्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने चार मार्च २०२१ रोजी स्थगिती दिली आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे पेचप्रश्न निर्माण झाला आहे. आता राज्य सरकारला ‘ओबीसीं’बाबत ‘इम्पिरिकल डेटा’ हा सर्वोच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे. केंद्र सरकारकडून ही माहिती राज्य सरकारला मिळालेली नाही. केंद्र सरकारने ही माहिती राज्य सरकराला द्यावी यासाठी सरकार पाठपुरावा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची ही भेट महत्त्वाची मानली जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या