नितेश राणेंना 'जोर का झटका'; अटकपूर्व जामीन फेटाळला

नितेश राणेंना 'जोर का झटका'; अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आल्यामुळे मोठा धक्का राणेंना बसला आहे....

सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी शिवसेना नेते संतोष परब (Santosh parab) यांच्यावर हल्ला झाला होता. याप्रकरणी मुख्य संशयितास दिल्लीतून अटक करण्यात आली होती. यादरम्यान, नितेश राणे यांच्याविरुद्ध पुरावे मिळालेले होते.

यानंतर राणेंनी कोर्टात धाव घेतली. आज या जामीन अर्जावर सुनावणी झाली, यात अखेर त्यांचा जामीन नाकारण्यात आला आहे. (nitesh rane bail rejected) अटकेच्या भीतीमुळे गेल्या पंधरा दिवसांपासून नितेश राणे अज्ञातवासात होते.

राणे यांच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि १२० ब सह ३४ (कटकारस्थान) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Sindhudurg CC Bank) निवडणूक प्रचारापासून दूर करण्यासाठी शिवसेनेने मला या प्रकरणात अडकवले आहे, असा आरोप अर्जात करण्यात आला होता.

त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. यावर अखेर सुनावणी पार पडली.

Related Stories

No stories found.