Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याफडणवीसांच्या चौकशी प्रकरणी गृहमंत्री म्हणतात, “आरोपी म्हणून फडणवीसांना...”

फडणवीसांच्या चौकशी प्रकरणी गृहमंत्री म्हणतात, “आरोपी म्हणून फडणवीसांना…”

मुंबई | Mumbai

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यात​​​​​​ मुंबईच्या सायबर पोलिसांकडून (Mumbai cyber police) चौकशी झाली. पोलीस बदली अहवाल लीक प्रकरण आणि देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत माहिती दिली आहे.

- Advertisement -

फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही. नोटीस म्हणजे समन्स नाही. फडणवीसांकडे काही माहिती आहे. ती माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस गेले आहेत. तसेच एसआयटीच्या (SIT) कार्यालयातून काही गोपनीय पत्रं आणि तांत्रिक माहिती बाहेर गेली आहे. त्यामुळे त्याची माहिती घेण्यासाठी त्यांचा जबाब नोंदवला जात आहे, असं दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान पोलिस आयुक्त नितीन जाधव, पोलिस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत हे चौकशीसाठी सागर बंगल्यावर आले होते. देवेंद्र फडणवीस यांचा १२ वाजल्यापासून जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली. डीसीपी हेमराजसिंग राजपूत यांनी जबाब नोंदवून घेतला. जवळपास दोन तासांनी ही जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. डीसीपी, एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या