नवाब मलिकांना दिलासा! न्यायालयाने 'ती' मागणी केली मान्य

नवाब मलिकांना दिलासा! न्यायालयाने 'ती' मागणी केली मान्य

मुंबई | Mumbai

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाकडून अंशतः दिलासा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी नवाब मलिकांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. यानंतर त्यांच्यावर उपचारही करण्यात आले.

मात्र, खासगी रुग्णालयात उपचार मिळण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी नवाब मलिक यांच्यावतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाने सदर मागणी पूर्ण केली असून, नवाब मलिकांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

दरम्यान नवाब मलिक यांच्यावर आता कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार होणार आहेत. उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे.

Related Stories

No stories found.