मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

महाविकास आघाडीतील कुरबुरी थांबेना

मुंबई -

महाविकासआघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. आता नाराज असलेल्या काँगे्रसने मुंबई महानगर पालिकेची आगामी निवडणूक

स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आघाडीत वादाची नवी ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँगे्रसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नसीम खान यांनी याबाबतची माहिती एका मराठी वृत्तवाहिनीला दिली. आघाडी सरकारचे कामकाज किमान समान कार्यक्रमावर आधारित आहे. आम्ही स्वबळाचा नारा दिला असला, तरी त्याचा सरकारवर परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आघाडी सरकारचे कामकाज चालविण्यासाठी किमान समान कार्यक्रम असतानाही, अनेक गोष्टी काँगे्रसला अंधारात ठेवून केल्या जातात. काँगे्रसमधील काही नेते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असतात. सोनिया गांधी यांनी सरकारच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. आम्हाला राजकारण करायचे नाही, मुंबईचा विकास हेच मुंबई काँग्रेसचे ध्येय आहे, असेही ते म्हणाले.

महापालिकेची निवडणूक आणखी सव्वा वर्ष दूर आहे, पण त्याआधीच मुंबई काँगे्रसला नवे नेतृत्व मिळाले आहे. भाई जगताप हे मराठा समाजातील मोठे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com