मुंबई, कोकणनंतर जळगाव जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला

शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांचे प्रतिपादन
मुंबई, कोकणनंतर जळगाव जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला

जळगाव - Jalgaon

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई मोठी आहे. अवघा महाराष्ट्र त्यांच्याच पुण्याईवर चालू आहे. शिवसेनेचे भाग्य आहे की, गेल्या पाच वर्षात शिवसेना संपाविण्याचा प्रयत्न झाला, आपण जणू गुलाम होतो, राज्याचं नेतृत्व शिवसेनेने करावं ही शिवसैनिकांची भावना होती आणि मुंबई कोकणनंतर शिवसेनेचा मोठा आधार म्हणजे जळगाव जिल्हा बालेकिल्ला आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार आहेत. उत्तर महाराष्ट्राच्या टेकडीवर शिवसेना भक्कम आहे, असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी केले. जळगाव लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये शनिवारी झाली.

यावेळी शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे संपर्क नेते, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी उपस्थितांना संघटना बांधणीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महाविकास आघडी सरकार स्थापने वेळेचे अनुभव कथन करत विविध पैलू उलगडून सांगितले आणि संघटनेचे महत्व पटवून दिले. तसेच शिवसेना संघटनेचा रोमांचक इतिहास देखील त्यांनी यावेळी कथन केला.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, आ.चंद्रकांत पाटील, शिवसेना उपप्रमुख प्रा.चंद्रकांत सोनवणे, शिवसेना उपप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, महिला आघाडीच्या प्रमुख महानंदा पाटील आदी उपस्थित होते.

बाळासाहेब व्यक्ती नव्हे शक्ती

मंत्र्यांला कमी पण शिवसैनिकाला घाबरतात. ही ताकद आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिली आहे. तलवारीची धार म्हणजे सामना आहे. रोजचा अग्रलेख दिल्ली प्रधानमंत्री कार्यालयात भाषांतर करून पाठविले जाते. सामनाची दाखल घेतली जाते. हे संघटनेचे बळ आहे. बाळासाहेबांचा विचार यातून प्रदर्शित होतो.आमचा पिंड शिवसैनिकाचा आहे, ती माती घेवून आम्ही व्यासपीठपर्यंत पोहोचलो. बाळासाहेबांनी आपल्याला जे घडवलं ते आपण कुणीही विसरू शकत नाही. ती व्यक्ती नव्हती ती शक्ती बाळासाहेब नसते तर महाराष्ट्र नसता, वैभव स्वाभिमानी लढण्याची ताकद मिळाली नसती. हिंदुत्वासाठी लढताना शिवसेनेवर खटले दाखल देखील दाखल झाले. मात्र, संघटना वाढीसाठी ही लढाई कामात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com