मुक्ता टिळक
मुक्ता टिळक|राजकीय
राजकीय

आमदार मुक्ता टिळक कोरोना मुक्त

ट्विट करत दिली माहिती

Rajendra Patil Pune

पुणे । pune

भाजपच्या कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक आणि त्यांच्या आई कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांनी स्वतः ही माहिती ट्विट करत दिली आहे.

लोकमान्य टिळकांच्या जयंतीदिनी आपण मोठ्या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडलो असून पुन्हा एकदा समाज सेवेला जोमाने सुरुवात करणार असल्याची प्रतिक्रिया मुक्ता टिळक यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.

टिळक यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर टिळक कुटुंबीयांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात मुक्ता टिळक आणि त्यांच्या आई यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. घरातील इतर सदस्यांची चाचणी निगेटीव्ह आली होती. आमदार टिळक आणि त्यांच्या आहे यांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. दोघी ही उपचारानंतर आता कोरोनामुक्त झाल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com