खा. विखे म्हणाले, संजय राऊत बेजबाबदार
राजकीय

खा. विखे म्हणाले, संजय राऊत बेजबाबदार

करोनाच्या काळात सर्व डॉक्टर जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडत असताना राऊत यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे

Nilesh Jadhav

लोणी | Loni

नुकतेच खा.राऊत यांनी डॉक्टर व जागतिक आरोग्य संघटनेला करोनासाठी कोणते औषधे द्यायचे हे कळत नाही असे वक्तव्य केले होते.

खा.सुजय विखे यांनी लोणी बुद्रुक येथे आज सकाळी दूध दर वाढीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याच्या आंदोलन प्रसंगी बोलताना खा.राऊत यांच्या विधानाचा डॉक्टर संघटनेच्या वतीने निषेध नोंदवताना सांगितले की, करोनाच्या काळात सर्व डॉक्टर जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडत असताना राऊत यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे, मी स्वतः दररोज डॉक्टर म्हणून सेवा देतो, एका जबाबदार शिवसेना खासदारांचे हे बेजबाबदार वक्तव्य आहे असे ते म्हणाले. तुम्हाला करोनाची परिस्थिती हाताळता येत नाही, सर्व काही केंद्राने करायचे असेल तर सत्ता सोडा, आम्ही उत्तम प्रकारे काम करून दाखवतो असे आव्हान त्यांनी दिले

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com