प्रतापगडावरची अफझल खानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा; उदयनराजेंनी का केली मागणी?

प्रतापगडावरची अफझल खानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा; उदयनराजेंनी का केली मागणी?

सातारा | Satara

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरी शेजारील ( Encroachment Near Afzal Khan Tomb) अतिक्रमण पूर्णपणे हटवण्यात आलं आहे. आता सध्या तिथे फक्त हटवण्यात आलेल्या अतिक्रमणाचा ढिगारा आहे. हा ढिगाराही हटवण्यात येत आहे.

दुसरीकडे या अतिक्रमणावरील कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तर अतिक्रमणावर झालेली कारवाई योग्यच आहे, असं म्हणत भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) यांनी सरकारच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. तसेच अफजल खानाची कबर खुली करायला हवी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

उदयनराजे भोसले बोलताना म्हणाले की, 'आताची आणि भावी पिढी आहे, त्यांना कळायला हवं, की ही कबर इथे का आहे..?, त्यामागील इतिहास काय?, याबाबत आताची आणि भावी पिढी आहे, त्यांना कळायला हवं. पर्यटनासाठी अफजल खानची कबर खुली करायला हवी, कारण त्याशिवाय इतिहास जिवंत राहणार कसा?, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

तसेच, 'संपूर्ण जगभरात प्रत्येकाच्या भावना शिवरायांच्या ‘भवानी’ आणि ‘जगदंबा’ तलवारीशी जुळल्या आहेत. प्रत्येकाला वाटते की ती भारतात यावी. ती सध्या इंग्लंडमध्ये जिथे ठेवली आहे, तिथे प्रचंड सुरक्षा आहे. मी स्वत: ते सर्व बघितलं आहे. ती तलवार आता मोठ्या मनाने ब्रिटीश सरकारने परत करायला हवी, त्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे', अशी मागणीही उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com