देवेंद्र जी आपसे ये उम्मीद ना थी ! - सुप्रिया सुळे

देवेंद्र जी आपसे ये उम्मीद ना थी ! - सुप्रिया सुळे

पुणे |प्रतिनिधी| Pune

मला माहित नाही फडणवीस खोटं बोलतात का? कारण शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, हे सुधांशू त्रिवेदी यांचे वक्तव्य जर खोटे आहे, असे फडणवीस म्हणत असतील तर त्यांनी न्यायालयात जायला पाहिजे. परंतु असे विधान करणे हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. देवेंद्र जी आपसे ये उम्मीद ना थी.. माझी त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होती, असा टोला त्यांनी लगावला. फडणवीस याआधी राज्याचे मुख्यमंत्री होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा आता यापढे भारतीय जनता पक्षाला अधिकार असेही त्या म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बोलताना म्हणाले की, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे सुधांशू त्रिवेदी यांनी कुठेही म्हटले नाही असे विधान केले होते. त्याला आता प्रत्युत्तर म्हणून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सुळे म्हणाल्या, आम्ही केले तर चूक असते त्यांनी केले की मनात तसे काहीही नसते. दिल्लीवरून कोणाचा फोन आला असेल. मला माहित नाही पण त्यांना बाहेर येऊन डेफिनच करावा लागणार होत. पण हे दुर्दैवी आहे.  

एक वेळ केलेली चूक ही चूक असते. परंतु ती जर चूक वेळोवेळी करत असतील तर ते जाणीवपूर्वक केलेले विधाने असतात आणि राज्यपाल हे जाणीवपूर्वक करत आहेत, अशी टीका ही सुप्रिया सुळे यांनी केली.

माझी राष्ट्रपती आणि केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की आता पुरे झालं या राज्यपालांना तुम्ही परत बोलवा. महाराष्ट्रामध्ये आम्ही फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा दिलेला आहे. छत्रपतीचा इतिहास आणि महत्त्व बदलण्याचे पाप भाजपा वारंवार करते. त्यामुळे सावरकरांच्या वक्तव्यावर आंदोलन करणारे छत्रपतींच्या वक्तव्यावर तेवढया आक्रमकपणे आंदोलन करतील, अशी मला अपेक्षाही नाही. मला त्यात आश्चर्यही वाटत नाही, असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com