Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यारिया चक्रवर्तीला A U नावाने फोन करणारा व्यक्ती म्हणजे...; राहुल शेवाळेंचा मोठा...

रिया चक्रवर्तीला A U नावाने फोन करणारा व्यक्ती म्हणजे…; राहुल शेवाळेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

अभिनेता सुशांत राजपूत याच्या मृत्यू (Sushant Singh Rajput) प्रकरणात राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे….

- Advertisement -

सुशांत राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) A U नावाने 44 फोन आले होते, हा A U म्हणजे आदित्य-उद्धव (Aditya-Uddhav Thackeray) असल्याची बिहार पोलिसांनी (Bihar Police) माहिती दिल्याचा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला आहे. लोकसभेत (Loksabha) बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

याआधी आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आरोप करण्यात आले होते, आता पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

A U संदर्भात बिहार पोलीसांची माहिती खोटी असेल तर त्यासंदर्भात सीबीआयने खुलासा करावा अशी मागणीही राहुल शेवाळे यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी शेवाळे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. राहुल शेवाळे यांनी पुरावे असतील तर सादर करावेत असे आव्हान मनिषा कायंदे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या