लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला ?

राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांचा संताप
लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला ?

मुंबई | Mumbai

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आज खार पोलिसांनी अटक केली आहे. या दामप्त्याची आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कलम 153 (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आणखी काही कलमं देखील लावण्यात आलेले आहेत.

यांच्या अटकेनंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा केली जातेय, त्याची साधी दखल सुद्धा नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. इतका द्वेष आणि इतका सत्तेचा माज? तसेच लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या संबंधी एक ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार ? इतका द्वेष ? सत्तेचा इतका माज ? सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी ? सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, पण, जनता सारे काही पाहते आहे. निव्वळ लज्जास्पद. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला ? लोकशाहीचे गार्हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का? असे फडणवीस यांनी ट्वीट करून संताप व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.