VIDEO : गणपती विसर्जनाच्या पद्धतीमुळे नवनीत राणा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर!

VIDEO : गणपती विसर्जनाच्या पद्धतीमुळे नवनीत राणा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर!

मुंबई | Mumbai

दहा दिवसांच्या मनोभावे पूजा केल्यानंतर गणेश भक्तांनी शुक्रवारी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तर, नेतेमंडळींनीही मोठ्या थाटात गणेश विसर्जन केले. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या गणपती विसर्जनावरून चांगल्याच चर्चेत आहेत.

गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन (Ganesh Visarjan) करण्यासाठी नवनीत राणांनी आधी बाप्पाला डोक्यावर घेत विसर्जन तलावापर्यंत घेऊन गेल्या आणि नंतर मूर्तीला तलावात थेट अक्षरश: फेकून देत विसर्जन केलं. ज्या पाण्यात राणांनी बाप्पाचं विसर्जन केलं, ते पाणी खूपच अस्वच्छ होतं, गढूळ होतं.

नवनीत राणांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. . हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राणा दाम्पत्याविरोधात सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही युजर्सने हिंदुत्वाच्या ठेकेदारांची कृती पाहा असं म्हणत संताप व्यक्त केला. तर, काहींनी हेच का तुमचे हिंदुत्व असा सवाल केला. हिंदू देवतेचा, धर्माचा अपमान केल्याबाद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी काहींनी केली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून नवनीत राणा यांच्या अडचणीत भर पडत आहे. हनुमान चालिसा वाचण्यावरुन आक्रमक झालेल्या नवनीत राणा यांना एका मुलाखतीत हनुमानाचा अर्थ विचारला असता त्यांना सांगता आला नव्हता. यावरुनही त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com