खासदार नवनीत राणा यांच्या प्रकृतीत सुधारणा
राजकीय

खासदार नवनीत राणा यांच्या प्रकृतीत सुधारणा

तुमच्या प्रार्थनांमुळे मी बचावले, शेअर केला व्हिडीओ

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना गुरुवारी (13 ऑगस्ट) मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यापूर्वी त्यांच्यावर नागपूरमधील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, नवनीत राणा यांनी आज यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि आपल्या प्रकृतीत सुधारणा होत असून आयसीयूमधून आता सामान्य कक्षात आणण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी दिली. MP Navneet Kaur-Rana

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com