Friday, April 26, 2024
Homeराजकीयखा.लोखंडे म्हणतात, अहमदनगरचे अंबिकानगर करा

खा.लोखंडे म्हणतात, अहमदनगरचे अंबिकानगर करा

नेवासा | Newasa

शिर्डी लोकसभेचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी औरंगाबाद नामकरणाच्या वादात उडी घेतली असून

- Advertisement -

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण कराच पण अहमदनगरचेही आंबिकानगर असे नामकरण करा, अशी मागणी त्यांनी केली. यावरूनही आता नगर जिल्ह्यात नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना खा.लोखंडे म्हणाले, औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे ही सर्व जनतेची अपेक्षा आहे. खासदार म्हणून माझी ही तीच मागणी आहे. आमचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील.औरंगाबाद बरोबरच अहमदनगरचे ही आंबिकानगर असे नामकरण व्हावे अशी माझी मागणी आहे.

एकिकडे राज्यातील आघाडी सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद चे संभाजीनगर असे नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे जाहीर केलेले असतांना आता अहमदनगरचे नामकरण आंबिकानगर करा असे वक्तव्य करून खा.लोखंडे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या