अजित दादा हे शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होते , पण...

गिरिष बापटांची अजित पवारांवर टीका
अजित दादा हे शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होते , पण...

पुणे - ‘दादा, शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होते, पण आता त्यांचे (अजित पवार) कार्यकर्तेही ऐकत नाही हे माहिती झाले. त्यामुळे यातच सगळी ग्यानबाची मेक आहे.’ अशा शब्दांत भाजप खासदार गिरीश बापट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचे शनिवारी पुणे शहरात उद्घाटन झाले. यावेळी कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणावरुन बापट यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

अजित दादा हे शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होते , पण...
भाजपशी जुळवून घेण्यासंदर्भातील ‘त्या’ पत्रावर जयंत पाटील म्हणाले...

राष्ट्रवादी पश्‍चिम महाराष्ट्रातील एक छोटासा पक्ष आहे, तो काही अखिल भारतीय पक्ष नाही. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत आमचं प्राध्यान राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला राहील असेही गिरीश बापट म्हणाले.

अजित दादा हे शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होते , पण...
साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी डॉ. सुधीर तांबेंची निवड करा

भविष्यात भाजप-सेना युती होऊ शकते -

प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना गिरिश बापट म्हणाले, भीतीच्या पलीकडे आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रताप सरनाईक यांची बोलकी प्रतिक्रिया देते आहे. भविष्यात काळात अशा गोष्टी होऊ शकतात. अनैसर्गिक लोकांमूळे आमची युती तुटली होती, भविष्यात युती होऊ शकते, आम्हाला त्याचा आनंद होईल. नाईक आत्ता जे बोलले ते भाजप नेते महाविकास आघाडी होत असतांना बोलत होते. त्यांचे नेते सकारात्मक विचार करतील. आता निर्णय उद्धव ठाकरे यांना घ्यायचा आहे.

अजित दादा हे शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होते , पण...
साई संस्थान अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून सुरेशराव वाबळे यांच्या नावाची चर्चा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com