
दिल्ली | Delhi
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (India Jodo Yatra) अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक, मल्लिकार्जून खडगे यांची पक्षाध्यक्ष म्हणून झालेली निवड आणि राहुल गांधी यांची सुधारलेली प्रतिमा या सर्वांचा काँग्रेस पक्षाला जोरदार फायदा होताना दिसतो आहे. त्यामुळे काँग्रेसही मोठ्या आत्मविश्वासात वावरताना दिसते आहे.
त्यातच काँग्रेसने मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांबाबत जोरदार दावा केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेकदा सर्व्हे (RSS Survey For BJP) घेतला आहे. त्या सर्व्हेच्या निकालामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आरएसएसने केलेल्या सर्वच सर्व्हेमध्ये मध्य प्रदेश राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत येत असल्याचे जनमत पुढे आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. आरएसएसच्या सर्व्हेमुळे भाजपमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचेही म्हटले आहे.
काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर काय म्हटलंय?
आरएसएसच्या सर्व्हेने भाजपात खळबळ, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत आहे
मध्य प्रदेशमध्ये यावर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीआधी अनेक सर्व्हे समोर आले आहेत. यात मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येत असल्याचं दिसत आहे. भाजपाला केवळ ५५ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. काँग्रेसकडे २०१८ च्या १५ महिन्यांचा कार्यकाळाचा अनुभव आणि कमलनाथ यांच्यासारखा निर्विवाद व अनुभवी नेता आहे. हे मुद्दे घेऊन काँग्रेस जनतेसमोर जात आहे.
भाजपाची १८ वर्षांची देणेदारी आणि अपूर्ण घोषणांमुळे जनतेत सरकारविरोधी मोठी लाट तयार झाली आहे. मागील पाच महिन्यात मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत सहा वेगवेगळे सर्व्हे झाले आहेत. सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाच्या जागा सातत्याने कमी होताना दिसत आहे. इतकंच नाही, तर सर्व सर्व्हेंमध्ये भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचं समोर येत आहे.
हा सर्व्हे समोर आल्यानंतर मध्य प्रदेश भाजपात खळबळ उडाली आहे. तसेच विद्यमान ६० टक्के आमदारांचं तिकीट कापावं अशी सुचनाही येत आहे.
६ सर्व्हे
१. जानेवारी २०२३ : सोशल मीडियावर संघाचा एक सर्व्हे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात भाजपाला १०३ जागा मिळून सत्तेबाहेर जावं लागत आहे.
२. फेब्रुवारी २०२३ : काँग्रेसचा एक अधिकृत सर्व्हे समोर आला. यात भाजपाला केवळ ९५ जागा मिळत आहेत.
३. मार्च २०२३ : गुप्तचर विभागाचा एक गुप्त सर्व्हे लिक झाला. त्यात भाजपाला ८० पेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहे.
४. एप्रिल २०२३ : अनेक वृत्तसमुहांचे सर्व्हे प्रशासनात व्हायरल झाले आहेत. यात भाजपाला केवळ ७० जागा मिळत आहेत.
५. मे २०२३ : ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक सर्व्हे झाला त्यात भाजपाला केवळ ६५ जागा मिळताना दिसत आहे.
६. जून २०२३ : एका वृत्त वाहिनीने एक सर्व्हे प्रकाशित केला. यात भाजपा सतेतेबाहेर जात असून केवळ ५५ जागा मिळत असल्याचं सांगण्यात आलं.
वरील सर्व सर्व्हेंमध्ये काँग्रेसच्या जागा वाढत असल्याचं आणि काँग्रेस जनतेचा आवाज म्हणून पुढे येत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे भाजपाची स्थिती वाईट होत आहे. यावरून हे स्पष्ट आहे की, यावेळी भाजपा ५० पेक्षा कमी जागांवर निवडून येईल.