Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यासुजय विखे पाटलांची लोकसभेत फुल्ल बॅटिंग, शेरोशायरी करत विरोधकांना चिमटे... पाहा VIDEO

सुजय विखे पाटलांची लोकसभेत फुल्ल बॅटिंग, शेरोशायरी करत विरोधकांना चिमटे… पाहा VIDEO

राहाता | प्रतिनिधी

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काल नवीन संसद भवनात आपल्या निवेदनात चांद्रयान -३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण वैज्ञानिकांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांनी त्यांनी ‘वाकिब कहा जमाना हमारी उड़ान से, वो और थे जो गए आसमान से, रखकर चांद पर कदम आज हमने इतिहास बना दिया, जिनको शक था हमारी काबिलियत पर, आज उन सबको गवाह बना दिया अशी शेरोशायरी करत निवेदन केले.

- Advertisement -

पाहा VIDEO

‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी क्लिक करा

विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की लहानपणी आम्ही नेहमी ऐकलेली कविता “चंदामामा दूर के पुए पकाए पुरके, आप खाए थाली में मुन्ने को दे प्याली में” या कवितेचा दाखला देत ते म्हणाले, देश स्वतंत्र झाल्यापासून आतागायत तसेच आहे. स्वतः चांदीच्या ताटात खाल्ले मात्र गरिबाला साधे पाणी पण दिले नाही. मात्र पंतप्रधान मोदी यांनी गरिबांच्या घरापर्यंत पाणी पोहचविले . चांद्रयान 2 अयशस्वी झाल्यावर इस्रोचे (ISRO) संचालक हे खूप नाराज झाले होते मात्र नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी त्यांना त्यावेळी नुसता धीर दिला नाही तर त्यांना पुन्हा नव्या जोमाने चांद्रयान 3 मोहीम सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. या यशस्वी मोहीमबद्दल त्यांनी खास शेरोशायरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या