खा. अमोल कोल्हे शिंदे गटाच्या कार्यालयात

सत्कार आणि स्वागतासाठी एकच झुंबड
खा. अमोल कोल्हे शिंदे गटाच्या कार्यालयात

नाशिक्। विजय गिते

राजकारणात कोणीच कोणाचा मित्र नसतो तर कायमस्वरूपी शत्रूही नसतो.याचा प्रत्यय पुन्हा एकदा नाशकात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेले अभिनेते अमोल कोल्हे यांच्या स्वागतासाठी बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची एकच झुंबड उडाल्याचे सोमवारी (दि.9) पहायला मिळाले.यावेळी खासदार हेमंत गोडसे यांचाही यात समावेश होता.

राजकीय कट्टर विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, दरम्यानच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येऊन महाविकास आघाडी तयार झाली आहे. या आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेतून शिंदे यांचा गट बाजूला पडून त्यांनी सवता सुभा मांडला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आता बाळासाहेबांची शिवसेना हा नवीन पक्ष उदयास आला असून नाशिकचे खासदार हेमंत गोडसेही या पक्षात डेरे दाखल झाले आहेत.त्यांचा हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर चांगलेच राजकीय तोंडसुख घेताना दररोजचा अनुभव येत आहे. अशा परिस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना कडून राष्ट्रवादीच्या खासदारांचे स्वागत करण्यासाठी रांगा लावत झुंबड उडणे ही बाब राजकीय दृष्ट्या न पचण्यासारखीच आहे.मात्र,हे सोमवारी नाशकात घडले.तेही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयात.

भेटीमागचे गुपित

नाशिकमध्ये दि.21 ते 26 जानेवारी दरम्यान जगदंब क्रिएशन आयोजित छत्रपती संभाजी महाराज महानाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी नाशिकमधील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यालयात खा.गोडसे यांची भेट घेत त्यांना निमंत्रण दिले.त्यावेळी राजकीय जोडे बाजूला ठेवत सर्वांचीच कट्टर राजकीय विरोधी पक्षाच्या खासदार कोल्हे यांच्या सत्काराबरोबरच सेल्फी आणि त्यांच्याबरोबर आपली छबी टिपण्यासाठी रांगा लावत झुंबड उडाली होती.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com