भाजप नेत्यांवर सर्वाधिक गुन्हे - राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला

भाजप नेत्यांवर सर्वाधिक गुन्हे - राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

ज्या राजकीय लोकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र ( Election affidavit ) सादर केले आहे त्यात सर्वाधिक गुन्हे असणारे नेते ( Leaders with the most crimes ) हे भाजपचे आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP spokesperson Nawab Malik )यांनी शनिवारी लगावला.

राज्य सरकार गुंड आणि पोलिसांच्या जीवावर चालते, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे. या आरोपाला मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Union Home Minister Amit Shah ) हे ज्यापध्दतीने गुजरातमध्ये सरकार चालवत होते. त्यांच्या सरकारमध्ये पुरुषोत्तम सोलंकी नावाचा दाऊदचा हस्तक होता, त्याला मंत्री केले होते. ज्यांच्यावर टाडा लावला होता त्यांना मोदी मंत्री करीत होते. आजही मोदींच्या कॅबिनेटमध्ये असे लोक आहेत, असेही मलिक म्हणाले.

दरम्यान, देशात दरदिवशी एक कोटी लस उपलब्ध झाली पाहिजे. तर महाराष्ट्रात दरदिवशी २०-२५ लाख लोक लसीच्या दुसर्‍या डोससाठी प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे देशात एका दिवसात एक कोटीचा लसीचा टप्पा पूर्ण करण्यात आला हा मोठेपणाचा विषय नाही, असा टोलाही नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या दोन राज्यात जास्तीत जास्त लस साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com