Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयधनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी नंदुरबारात मोर्चा

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी नंदुरबारात मोर्चा

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

- Advertisement -

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार तथा लैंगिक अत्याचाराविरोधात एफ.आय.आर. दाखल करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जात आहे.

मात्र सदर पोलीस स्टेशनने तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. म्हणून संबंधीत महिलेने मुंबई पोलीस आयुक्तांना दि.11 जानेवारी रोजी निवेदन दिले. परंतु आजपर्यंत पोलीसांनी गुन्हा दाखल करुन घेतलेला नाही.

कोणतीही महिला एफआयआर दाखल करण्यासाठी आली तर त्वरीत तक्रार दाखल करावी असे केंद्र सरकारचे निर्देश असतांना देखील केवळ राजकीय दबावापोटी ही केस खोटी आहे असे कारण देऊन पोलीस सदर केस नोंदविण्यास टाळाटाळ करीत आहेत.

सदर केसचा खरेखोटेपणा ठरविण्याचा अधिकार न्यायालयास आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून आपले पिडित महिलेच्या बहिणीशी परस्पर संमतीने विवाहबाह्य संबंध असून सदर नात्यातून मला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये असून त्यांना मी माझे नाव दिले आहे व हा सर्व प्रकार माझ्या लग्नाच्या पत्नीला व मुलांना माहिती आहे असा उल्लेख केलेला आहे.

महिलेवर अत्याचार करणार्‍या श्री.मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा त्वरीत राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज भाजपा महिला मोचातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष किन्नरी सोनार, सविता जयस्वाल, सपना अग्रवाल कल्पना पंड्या, नंदा सोनवणे, मीना मेहता, अनामिका चौधरी, भावना लोहार, प्रतिभा पवार, संगीता गावित, जिग्नेशा राना आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या