पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरु होणार

कामकाज सल्लागार समितीची आज बैठक
पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरु होणार

मुंबई Mumbai / प्रतिनिधी


राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) विस्तारामुळे (Due to expansion) रखडलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Legislature) येत्या १७ ऑगस्टपासून सुरु होणार असल्याचे समजते. यासंदर्भात आज, मंगळवारी विधान भवनात कामकाज सल्लागार समितीची (Working Advisory Committee) बैठक (meeting) होत असून त्यात अधिवेशनाच्या तारखेवर शिक्कामोर्तब केले जाईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज सकाळी ११ वाजता होत आहे. त्यानंतर दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल. या बैठकीनंतर विधान भवनात बैठक होऊन अधिवेशनाचे कामकाज निश्चित केले जाईल. या बैठकीसाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.


महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन १८ जुलै २०२२ रोजी होईल, असे घोषित करण्यात आले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळे आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार आले. त्यामुळे पावसाळी अधिवेशन लांबले.


दरम्यान विधिमंडळ सचिवालयाने सोमवारी कार्यालयीन आदेश जारी केला आहे. या आदेशात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० ऑगस्टपासून प्रस्तावित असल्याचे म्हटले आहे. मात्र, नवीन मंत्र्यांना तयारी करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून घेण्याचा निर्णय होणार आहे. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे.


अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळ सचिवालयाने आज, मोहरमच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आपले कार्यालय सुरु ठेवले आहे. तसेच ९ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com