Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअधिवेशनाआधी अजित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले...

अधिवेशनाआधी अजित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

मुंबई | Mumbai

राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

चहापानावर बहिष्कार

अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला असल्याची घोषणा केली आहे. सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची वेगवेगळी कारणं आहेत. प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वाहतूक व्यवस्थाच बंद पडली आहे. अनेक पुलावरुन पाणी वाहत असल्यानं दोन्ही भागाचा संपर्क तुटलाय. ज्या प्रकारे शेतकरी, शेतमजुरांना मदत झाली पाहिजे ती होत नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही समाधानी नाही. ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ७५ हजार अनुदान द्या. फळबागांच्या नुकसानापोटी हेक्टरी सव्वालाखाची मदत करा. अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करा, अशी मागणी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलीय.

शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करावी

अजित पवार म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करावी. एनडीआरएफचे निकष हे अतिशय तुटपुंजे आहेत. सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. शेतकरी असतील, विद्यार्थी असतील या सर्वांना तातडीने मदत जाहीर केली पाहिजे. तसेच, सरकार कुणाचेही असो शेतकऱ्याला तातडीने मदत दिली पाहिजे. पीक कर्जाचा आम्ही आढावा घेतला, ऑगस्ट उजाडूनही अनेक ठिकाणी ते देण्यात आलेले नाही. मराठवाड्यात गोगलगायीमुळे सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासंबंधी उपाययोजना आवश्यक आहेत. हे महत्त्वाचे विषय सोडून भलतेच अवांतर विषय काढले जात आहे. वंदे मातरमला विरोध असण्याचं कारण नाही, पण त्याचं औचित्य काय होतं? पेट्रोल-डिझेलचे दर निम्मे करणार असं हे म्हणत होते, पण यांनी दोन-तीन टक्केच दर कमी केले. यांच्यातील काही नेते महाराष्ट्र पेटेल अशी भाषा वापरतात, असेही अजित पवार म्हणाले.

हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, भाजपला पटत का?

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणावर राज्याचे अजित पवारांनी भाष्य केलं. ‘हे सरकार येऊन काहीच दिवस झाले आहेत तरी यांच्यातील काही आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटावा अशी भाषा वापरत आहेत. शिवसेनिकांना ठोकून काढा, त्यांचे हात तोडा, हात तोडता नाही आले तर तंगडी तोडा, अरे ला का रे म्हणा, कोथळा काढा अशी भाषा वापरत आहेत, ही काय पद्धत आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला काम करतानाचे संस्कार शिकवले. पण हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, भाजपला पटत का?’ असा सवाल त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या