Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याविधानसभेतील अभूतपूर्व गोंधळानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप

विधानसभेतील अभूतपूर्व गोंधळानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप

मुंबई | Mumbai

पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Legislature Assembly And Council Two Days Monsoon session 2021) पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

- Advertisement -

ओबीसींचा इम्पिरीकल डेटा (Imperial data of OBC) केंद्राकडून (Central Govt) मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला. यानंतर सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले, एवढच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.

ओबीसी मुद्यावरुन सत्ताधारी-विरोधकात घामासान, गोंधळात ठराव मंजूर

या अभूतपूर्व गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यामंत्री नवाब मलिक (spokesperson of NCP and Minister of State for Minorities Nawab Malik) यांनी भाजपावर (BJP) जोरदार टीका केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की, ‘अध्यक्षांच्या दालनात अध्यक्ष उपस्थित होते. तिकडे पीठासीन अधिकारी भास्कर जाधव जे काम करत होते, त्यांना जाऊन सगळ्यांनी घेरलं. त्यांच्याशी धक्काबुक्की केली आणि १५-१५ मिनिटं शिवीगाळ करत असताना, धक्काबुक्की करत असताना अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात (history of Maharashtra) कधी घडलेली नाही. दुःखद हे आहे की हे घडत असताना याचा पुढाकार या राज्याचे विरोधी पक्षनेते (Leader of the Opposition) करत होते. त्यांच्या नेतृत्वात अध्यक्षांच्या दालनात ही सर्व घटना घडली. तसेच, ‘आता भाजपावाल्यांना गुंडगिरी करून विधानसभेचं कामकाज चालवायचं असेल, तर हे कधीही चालणार नाही. या पद्धतीचा गुंडगिरीचा कारभार भाजपाकडून करण्यात आलेला आहे. निश्चित रुपाने संसदीय कार्यमंत्र्याच्या माध्यमातून जे जे लोकं जिथे जिथे ज्या प्रकारे त्यांची वागणूक होती. आमचा आग्रह राहील की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही स्पष्टपणे सांगतोय गुंडगिरी करून सत्ता काबीज करता येत नाही. जनतेने तीन पक्षांचं सरकार दिल्यानंतर बहुमत आहे. बहुमाताच्या आधारावर सरकार चालत आहे. कधी धमक्या द्यायच्या, कधी सांगायचं की आम्ही तुरूंगात टाकू, त्याच्यातूनही काही होत नसताना आता सरळ धमक्या, गुंडगिरी, मारामारी करण्याचं काम भाजपाची लोक करत आहेत. हे लोकशाहीच्या मार्गाला घातक आहे. महाविकासाघाडी सरकारचे तिन्ही पक्ष हे सहन करणार नाही. विधानसभेच्या नियमानुसार त्यांच्यावर जी कारवाई अपेक्षित असेल, आम्ही निश्चितपणे त्या कारवाईची मागणी अध्यक्षांकडे करणार आहोत.’ असंही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं. ()

तर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis) यांनी धक्काबुक्की झाली नसल्याचं म्हटलं आहे. ‘कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही. काही लोक, मंत्री जाणुनबुजून कामकाज काढून घेण्यासाठी आणि सभागृह चालू नये यासाठी गोष्टी तयार करत आहेत. परंतू त्यांनी काही केलं तरी आम्ही पुरुन उरलो आहोत. सर्वांसमोर त्यांचा बुरखा फाडणार आहे,’ असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. सभापतींना कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही. मी तिथे उपस्थित होतो असंही त्यांनी सांगितलं. तसेच ‘राज्य सरकारने ओबीसीच्या डेटासंबंधी (OBC data) ठराव मांडून पुन्हा एकदा दिशाभूल केली आहे. मागासवर्ग आयोगाने (Backward Classes Commission) इम्पेरिकल डेटा (Imperial data of OBC) तयार करण्याचे आदेश दिला असताना जनगणनेचा डेटा पाहिजे असं सांगण्यात आलं. मी सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) आदेशही वाचून दाखवला आहे. १५ महिने या सरकारने आय़ोग स्थापन केलेला नाही. हा ठराव आणून वेळ मारुन न्यायची आणि केंद्राकडे बोट दाखवायचं असा प्रयत्न केला,’ असा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या