मोदींनी देश कमकुवत केला, राहुल गांधींचा हल्लाबोल

राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारवर केली टीका
मोदींनी देश कमकुवत केला, राहुल गांधींचा हल्लाबोल

दिल्ली l Delhi

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. तसेच मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीवर त्यांनी भाष्य केले. राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटले आहे कि, "देशाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा मोदी सरकारच्या काळात आर्थिक मंदी असून, पंतप्रधान मोदींनी देशाच्या ताकतीला कमकुवत केलं आहे."

राहुल गांधी यांनी यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीचाही दाखला दिला आहे. जुलै ते डिसेंबर या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी आहा ८.६ टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत विकास दर (जीडीपी) उणे २३.९ टक्क्यांनी खाली आला होता. गेल्या वर्षी २०१९-२० मध्ये पहिल्या तिमाहीत विकासदर ५.२ टक्के होता. करोना आणि लॉकडाउन यामुळे उत्पादन, गृहनिर्माण, खाण, सेवा क्षेत्रात मोठी घसरण झाल्यामुळे ही वेळ ओढवली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com