दिल्ली | Delhi

पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर भाजपा नेते तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जींवर

हल्लाबोल करत आहेत. दरम्यान नुकतेच नरेंद्र मोदी यांनी व्हॉट्सअप डाउन झाल्याच्या मुद्द्यावरुन ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी रात्री १०.३० वाजल्यापासून जवळपास एक तासासाठी व्ह़ॉट्सअप डाऊन होते. प्रचारसभेदरम्यान नरेंद्र मोदींनी याचा उल्लेख करत पश्चिम बंगालच्या विकासाचा मुद्दा मांडला.

'तुम्हा सर्वांना माहिती असेल की रात्री व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ४० मिनिटांसाठी डाऊन होतं. प्रत्येकजण चिंतीत होता, एक तास त्यांना अडचण येत होती. बंगालमध्ये विकास, लोकांचा सरकारवरील विश्वास सगळं काही गेल्या ५० वर्षांपासून डाऊन आहे,' अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

तसेच, बंगालमध्ये ज्या पद्धतीने लोकांचं समर्थन मिळत आहे ते पाहता यावेळी राज्यात भाजपा सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट आहे. तुम्ही सर्व इतक्या मोठ्या संख्येने भाजपाला आशीर्वाद देण्यासाठी आलात हे माझं भाग्य आहे. यावरुन बंगालमध्ये यावेळी भाजपाचं सरकार येणार हे स्पष्ट आहे,' असं मोदींनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर, पश्चिम बंगालची गेली ७० वर्षे वाया गेली आहेत. या ७० वर्षात राज्याचं मोठं नुकसान झालं असून केवळ पाच वर्षे भाजपच्या हाती सत्ता द्या, ७० वर्षात झालेलं नुकसान भरुन काढतो असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. तसेच जर बंगालच्या जनतेने भाजपच्या हाती सत्ता दिली तर राज्याचा नियोजनबद्ध विकास करण्यात येईल. या राज्यातल कृषी, सिंचन आणि कोल्ड स्टोरेजची सुविधा देण्यात येईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालच्या जनतेला आश्वासन दिलं आहे.