Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामी कोणतंही पद मिळवण्यासाठी राजकारणात नाही - पंकजा मुंडे

मी कोणतंही पद मिळवण्यासाठी राजकारणात नाही – पंकजा मुंडे

मुंबई | Mumbai

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले. या नाराजीनंतर त्यांनी आपले राजीनामे सत्र सुरू केलं.

- Advertisement -

याच दरम्यान पंकजा मुंडे दिल्लीत जावून भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर आता पंकजा मुंडे मुंबईत आल्या आहेत. त्यामुळे या चर्चांना अधिक जोर चढला आहे. मुंबईत आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक मुंबईत आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर केले आहेत.

मुंडे साहेबांनी आयुष्यभर खस्ता खाऊन वंचितांना आवाज देण्यासाठी काम केलं. समाजातील तळागाळातील माणूस राजकारणात यायला पाहिजे, लोकप्रतिनिधी झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी सर्वसामान्यांना मंच उपलब्ध करुन दिला. आपल्या हाडामासाचा माणूस लोकांमध्ये उतरला पाहिजे, लोकांमध्ये राहून काम केलं पाहिजे, त्यामुळे त्यांनी मला राजकारणात आणलं. त्यामुळे माझ्या राजकारणाचा पाया मला मंत्री करा, बहिणीला मंत्री करा, नवऱ्याला मंत्री करा असा नाही. माझा परिवार महाराष्ट्रात मुंडे साहेबांवर प्रेम करणारा निष्पाप कार्यकर्ता आहे. माझ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी राजकारणात आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या