एकीकडे समर्थकांचे राजीनामा सत्र; पंकजा मुंडे दिल्लीत, तर्कवितर्कांना उधाण

एकीकडे समर्थकांचे राजीनामा सत्र; पंकजा मुंडे दिल्लीत, तर्कवितर्कांना उधाण

मुंबई | Mumbai

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet expansion) बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना डावलण्यात आल्यानंतर राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली होती.

कालपासून भाजपमधील अनेक मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या अचानक दिल्लीत (Delhi) दाखल झाल्यानंतर तर्क वितर्काना उधाण आले आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात आलं नसून पंकजा नाराज असल्याचं बोललं जातं होत. त्या पार्श्वभूमीवर पंकजा यांची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांची एक बैठक पार पडणार आहेत. या बैठकीत पंकजा मुंडे सहभागी होणार आहेत. यावेळी पंकजा मुंडे भाजपाध्यक्ष जे पी नड्डा (Bjp President J P Nadda) यांची भेट घेणार आहेत. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे समर्थकांची नाराजी पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार का? हे पहावं लागणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com