केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर?; शरद पवार म्हणाले...
शरद पवार

केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर?; शरद पवार म्हणाले...

मुंबई | Mumbai

नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळातील मोठ्या फेरबदलानंतर (Cabinet expansion) मंत्रिमंडळात नवीन चेहरे समाविष्ट करण्यात आले आहेत. यासह, एक नवीन सहकार मंत्रालय (Union Ministry of Cooperation) तयार करण्यात आले, ज्याची धुरा गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

दरम्यान अमित शाह यांच्याकडे मंत्रीपद गेल्याने राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील सहकार क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीचा दबदबा आहे. अशाच अमित शाह यांच्याकडे सहकार खात्याचा कार्यभार देण्यात आल्याने राज्यातील सहकार चळवळीत मत्तेदारी असलेल्या राष्ट्रवादीच्या अडचणी वाढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार
भाजप नेत्यांना आम्ही 'चंपा' किंवा 'टरबुज्या' म्हणणार नाही

'भारतीय राज्य घटनेनुसार सहकार हा विषय त्या त्या राज्य शासनाचा आहे. राज्याने केलेल्या सहकार कायद्यात केंद्राला (Central govt) हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे नवं सहकार खातं जरी निर्माण झाले असले तरी महाराष्ट्रावर गंडांतर येणार नाही यावर सध्या होत असलेली उलट सुलट चर्चा व्यर्थ' असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या सहकार कायद्यात केंद्राला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे राज्यातल्या सहकार चळवळीवर केंद्र सरकार गंडांतर आणेल या म्हणण्याला फारसा अर्थ नाही. मल्टीस्टेट बँका हा प्रकार केंद्राच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे सहकार मंत्रालय हा विषय नवीन नाही. मी दहा वर्ष कृषी खात सांभाळलं होतं तेव्हा हा विषय होता आजही आहे. असे पवार यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर, भास्कर जाधव यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या चर्चेविषयी बोलताना ते म्हणाले की, आमचा तीन पक्षाचा निर्णय स्पष्ट झाला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंध नाही. आम्हा तिन्ही पक्षाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असं ते म्हणाले.

शरद पवार
एकीकडे समर्थकांचे राजीनामा सत्र; पंकजा मुंडे दिल्लीत, तर्कवितर्कांना उधाण

तसेच, कॉंग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर ते म्हणाले की, प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करणार की नाही. त्यामुळे ते आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्नात असणार. त्यांनी भूमिका घेतली, यात काहीही चुकीचं नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. पक्ष आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार. यात काहीही चुकीचे नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचं काहीही नाही. सरकार एक विचारानं आहे की नाही हे महत्वाचं आहे.. ते एक विचारानं काम करतात, असं ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com