Modi cabinet expansion : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसह १२ मंत्र्यांचे राजीनामे

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आज मोठे फेरबदल पाहायळा मिळणार आहेत. जवळपास ४३ मंत्री आज सायंकाळी पदाची शपथ घेणार आहेत. या समारंभापूर्वीच अनेक मंत्र्यांनी राजीनामे देण्यात सुरुवात केलीये.

दरम्यान आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशाला नवीन आरोग्यमंत्री मिळणार आहेत. या अगोदर आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा, कामगार मंत्री संतोष गंगवार आणि शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, रतनलाल कटारिया, बाबुल सुप्रियो, प्रताप सारंगी, थावरचंद गहलोत, अश्विनी चौबे, आणि देवश्री बॅनर्जी यांनीही केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्रातून यांना संधी?

महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड यांची नावे निश्चित झाल्याचं सांगितलं जातंय.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *