Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याModi Cabinet Expansion : जाणून घ्या, मोदींच्या नव्या मंत्री मंडळात वर्णी लागलेल्या...

Modi Cabinet Expansion : जाणून घ्या, मोदींच्या नव्या मंत्री मंडळात वर्णी लागलेल्या महाराष्ट्रातील चार खासदारांबद्दल

अहमदनगर | Ahmednagar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात (Modi Cabinet) आज मोठे फेरबदल पाहायळा मिळणार आहेत. जवळपास ४३ मंत्री आज सायंकाळी पदाची शपथ घेणार आहेत. केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ४३ नेत्यांची यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून (Maharashtra) नारायण राणे (Narayan Rane), भागवत कराड (Dr Bhagwat Karad), भारती पवार (Dr Bharati Pawar) आणि कपिल पाटील (Kapil Patil) हे चार नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आपण जाणून घेऊयात या खासदारांबद्दल…

- Advertisement -

नारायण राणे

राज्यात सध्याच्या घडीला शिवसेना (Shivsena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना थेटपणे अंगावर घेणाऱ्या नेत्यांची नावे घ्यायची झाली तर त्यामध्ये नारायण राणे (Narayan Rane) हे नाव अग्रस्थानी असेल. एकेकाळी कट्टर शिवसैनिक असणारे नारायण राणे काँग्रेस (Congress), महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष (Maharashtra Swabhiman Paksha)) असा प्रवास करुन आता भाजपमध्ये स्थिरावले आहेत. नारायण राणे यांचा आक्रमक बाणा हा कोणत्याही पक्षात गेला तरी कायम असतो. वेळ पडल्यास ते पक्षनेतृत्त्वालाही सुनवायला मागेपुढे पाहत नाहीत. वयाच्या २० व्या वर्षी राणे यांचे संबध शिवसेनेसोबत आले, चेंबूर (Chembur) येथे शाखा प्रमुख पद राणेंना देण्यात आले.

त्यांनी मुंबईतील चेंबूर येथून सेनेचे शाखाप्रमुख म्हणून राजकीय जीवनाला प्रारंभ केला. नगरसेवक झाल्यावर त्यांनी मागे वळून पहिले नाही. १९९६ शिवसेना भाजप सरकारमधील (Shivsena BJP Govt) महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले. १९९९ साली मनोहर जोशी (Manohar Joshi) मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच राणेना काही महिन्या करिता मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळाली. उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदाची चर्चा सुरु झाल्यानंतर राणेचे शिवसेनेत खटके उडायला सुरवात झाली. ३ जुलै २००५ ला त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली परंतु शिवसेनेतून जाताना राणे अनेक समर्थक घेऊन कॉंग्रेस मध्ये गेले. युती सरकारच्या काळात राणे यांना BEST चे चेअरमन पद देण्यात आले या काळात कोकणातील अनेक लोकांना बेस्ट मधे काम करायला मिळाले. त्यानंतर जुलै २००५ मध्ये त्यांनी भारतीय कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

कॉंग्रेसमध्ये त्यांना महसूल मंत्री पद देण्यात आले व त्याच कॉंग्रेस मध्ये राणेवर २००८ साली पक्ष विरोधी कार्यवाही केल्याचा ठपकाहि लावण्यात आला. दरम्यान ८ ऑक्टोबर २००८ साली नारायण राणे यांनी प्रहार नावाचे वृत्तपत्र सुरु केले. दरम्यान २१ सप्टेंबर २०१७ रोजी राणे यांनी स्वेच्छेने कॉंग्रेस पक्ष सोडला. त्यांनतर त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याचे ठरविले. १५ ऑक्टोबर २०१९ रोजी ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले आणि त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलीन झाला. आणि ते भाजपतर्फे राज्यसभेवर निवडून आले.

Modi Cabinet Expansion : मंत्रीमंडळात नव्याने समावेश होणाऱ्या ४३ जणांची यादी जाहीर; ‘असं’ असेल मंत्रिमंडळ!

डॉ भारती पवार

डॉ भारती पवार (Dr Bharati Pawar) यांनी 5 जुलै 2019 मध्ये भाजपत प्रवेश (BJP) केला. शरद पवारांचे (Sharad Pawar) निकटवर्तीय असलेल्या दिवंगत माजी मंत्री ए टी पवार (NT Pawar) यांच्या त्या स्नुषा आहेत. डॉ पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते पदाबरोबरच प्रदेश उपाध्यक्षपद भूषविलेले आहे.

त्या राष्ट्रवादीकडून दोनदा जिल्हा परिषद सदस्यही राहिल्या आहेत. डॉक्टर असल्याने एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा म्हणून पहिले जाते. डॉ पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले आहे.

ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आणि काम आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार असताना, लाखांच्या घरात मते त्यांनी मिळवली.

२०१९ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार आयात केल्याने ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभुती मिळाली. स्वत:ची यंत्रणा आणि आता सत्ताधारी भाजपची ताकद मिळाल्याने दिंडोरीत त्यांच्यासह पक्षाचीही ताकद वाढली आहे.

कपिल पाटील

कपिल पाटील (Kapil Patil) हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या भिवंडी मतदारसंघातून (Bhiwandi Lok Sabha constituency) निवडून गेले. कपिल पाटील हे ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे (Thane District Co-operative Bank) अध्यक्ष होते. तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मार्च २०१४ मध्ये ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून (NCP) भारतीय जनता पार्टीत गेले.

भागवत कराड

डॉ. भागवत किशनराव कराड (Dr. Bhagwat Kishanrao Karad) रा. चिखली ता. अहमदपूर जि. लातूर या मूळ गावचे आहेत. त्यांचं सातवी पर्यंतचे शिक्षण चिखली या जि. प.च्या शाळेत झाले तर ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण अंधोरी जि. प. शाळेत झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी संस्थेच्या मोफत वसतीगृहात राहून अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून (Mahatma Gandhi College Ahmedpur) प्री मेडिकलचे (Pre-Medical) शिक्षण पूर्ण केले.

१९७२ साली त्यांनी औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College, Aurangabad) प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून एमबीबीएस व एम.एस. (जनरल सर्जरी) (MBBS and M.S. (General Surgery)) ही पदवी त्यांनी संपादन केली. एम.एस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील (Mumbai University) वैद्यकीय क्षेत्रातील अति उच्च पदवी एम. सीएच (पेडियाट्रीक) (M. CH (pediatric)) ही पदवी त्यांनी मिळवली. मराठवाड्यातील अशा प्रकारची पदवी घेणारे ते वैद्यकीय क्षेत्रातील पहिले डॉक्टर ठरले.

पत्नी डॉ. अंजली कराड (Dr Anjali Karad) या देखील नामवंत अश्या डॉक्टर आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री व भाजपा नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यासोबत त्यांची भेट झाली. मुंडेंनी त्यांच्या कामाची प्रशंसा करून त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. १९९५ साली ते संभाजीनगर महानगरपालिका कोटला कॉलनी वॉर्डातून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे उपमहापौर आणि नंतर औरंगाबाद शहराचे दोन वेळा महापौर होण्याचा मान मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या