Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याआगामी पालिका निवडणुकांसाठी मनसेचा 'एकला चलो रे'चा नारा

आगामी पालिका निवडणुकांसाठी मनसेचा ‘एकला चलो रे’चा नारा

मुंबई | Mumbai

आगामी पालिका निवडणुकांमध्ये मनसे (MNS), शिंदे गट आणि भाजप (BJP) एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासह शिंदे गटाचे नेते आणि भाजप नेते राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेत असल्याने ही वाढती जवळीक पाहता लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त होती होती.

पण यादरम्यान, आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेकडून ‘एकला चलो रे ‘चा नारा देण्यात आला आहे. अशी माहिती मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी दिली आहे. आगामी काळातल्या सर्व महानगरपालिका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. राज ठाकरेंच्या आदेशानुसार सर्व जागा लढण्याची तयारी आम्ही सुरु केली आहे. या आधी देखील आम्ही स्वबळावर निवडणुका लढल्या होत्या. आम्ही मुंबईत २२७ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत, असं संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.

आम्ही स्वतंत्र आहोत. सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झालाय. आम्ही सर्वच महापालिका निवडणुकीत आमची ताकद आजमावणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. युती हा जर तर चा विषय आहे. आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. कुठल्याही पक्षाचा बालेकिल्ला नसतो. आमचा विदर्भाचा दौरा सुरू होतोय. पक्ष वाढीसाठी हा आमचा दौरा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यासोबतच, दसरा मेळाव्यावरुन सुरु असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. दसरा मेळावा कधी आणि कुठे होतोय हे महत्त्वाचे नाही. बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत हे महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांचे विचार फक्त राज ठाकरे मांडतायत. त्यामुळे कोणाचा मेळावा कुठे होतो ह्याला फार महत्त्व नाही. असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या