Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमनसे-राष्ट्रवादीत संघर्ष पेटला; प्रबोधनकारांच्या ओळी ट्विट करत राज ठाकरेंचे सडेतोड प्रत्युत्तर

मनसे-राष्ट्रवादीत संघर्ष पेटला; प्रबोधनकारांच्या ओळी ट्विट करत राज ठाकरेंचे सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील (Maharashtra) जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादीला (NCP) जबाबदार धरले होते.

- Advertisement -

पारनेर तहसीलदारांच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन भाजपा आक्रमक

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचे वाचन करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान आज राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar thackeray book) यांच्या पुस्तकातील त्यांचा एक विचार सांगत राष्ट्रवादीला (NCP)सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.

“जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही… जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय!” असं टि्वट करत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर हल्ला केला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

‘राज ठाकरे यांनी आधी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं. हे लिखाणचं त्यांना योग्य रस्ता दाखवेल,” असं पवार म्हणाले. त्यावर राज ठाकरे यांनी आपणं आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं. “मी प्रबोधनकारांची पुस्तकं आणि यशवंतराव चव्हाण पण वाचलेत. मी जे बोललोय त्याच्याशी आजोबांचं काय संबंध?” असं राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं होत.

- Advertisment -

ताज्या बातम्या