राज ठाकरे पुन्हा सक्रिय, कार्यकर्ता मेळाव्यात चौफेर फटकेबाजी

राज ठाकरे पुन्हा सक्रिय, कार्यकर्ता मेळाव्यात चौफेर फटकेबाजी

मुंबई | Mumbai

मनसे प्रमुख (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरवात केलीय. शस्त्रक्रियेनंतर प्रथमच आज राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. केवळ महापालिका निवडणुकाच नव्हे मनसे आता स्थानिक पातळीपासून ते लोकसभेपर्यंतच्या तयारीला लागली असल्याचं चित्र आहे. दरम्यान यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी केली.

राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला त्यांच्या शस्त्रक्रियेचे काही किस्से सांगितले. आपला ट्रेडमार्क सेन्स ऑफ ह्युमर वापरून राज ठाकरे यांनी हे किस्से नेहमीप्रमाणे रंगवून सांगितले. हे सगळे किस्से ऐकताना सभागृहात चांगलाच हशा पिकला होता. माझ्यावर हिप बोन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा सगळेजण मला प्रश्न विचारत होते. मी एकाला सांगितलं की, माझी हिप (मांडी) रिप्लेसमेंट होणार आहे. त्यावर एकाने विचारले की, हिप रिप्लेसमेंट का करावी लागत आहे? तेव्हा मी म्हटलं की, इतकी वर्षे जवळच्यांनी आणि बाहेरच्यांनी माझी लावली आहे ना.... राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर सभागृहाच एकच हशा पिकला.

मी बंड केलं नव्हतं

छगन भुजबळ, नारायण राणे आणि नुकतीच झालेली एकनाथ शिंदे यांच्या गटाची बंडखोरी या कुणाशीही आपली तुलना करू नका, मी बाळासाहेब ठाकरेंना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो होतो, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. माझं बंड भुजबळ, राणे, शिंदेंच्या बंडाच्या यादीत घेऊ नका. हे सगळे एका पक्षात गेले, सत्तेत गेले. पण मी बाळासाहेब ठाकरेंना भेटून, त्यांना सांगून बाहेर पडलो आहे. मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं की राज ठाकरे आता पक्षात राहात नाही.. ती माझी शेवटची भेट होती, असं राज ठाकरे म्हणाले.

टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं?

यावेळी राज ठाकरेंनी टोलच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा आहे. मनसे कुठलंही आंदोलन अपूर्ण सोडत नाही. टोलमुक्तीचे आश्वासन शिवसेना-भाजपचं होतं. मात्र याबाबत आंदोलन मात्र मनसेनी केलं. शिवसेना-भाजपला कोणी प्रश्न का विचारत नाही? या टोलचा पैसा कुठे जातो हा मूळ प्रश्न होता, मात्र हे टोलबाबतच्या प्रश्नांची उत्तरं कोणत्याच सरकारने दिली नाही. म्हणजेच हा टोलचा पैसा सगळ्या पक्षांना जातो, आणि म्हणून नेते टोलबाबत प्रश्न विचारत नाहीत, तसेच मी टोल बंद करून दाखवतो असं राज ठाकरे यावेळी म्हणालेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com