Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरेंचा राणा दाम्पत्याला टोला, म्हणाले, “मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला...”

राज ठाकरेंचा राणा दाम्पत्याला टोला, म्हणाले, “मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला…”

मुंबई । Mumbai

मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ आज पुण्यात (Pune) धडाडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात राज ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी राणा दाम्पत्य (Rana Couple) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील वादावर भाष्य करतांना राणा दाम्पत्याला जोरदार चपराक लगावली.

- Advertisement -

राज ठाकरे म्हणाले की, ‘मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवा ही मागणी आम्ही केल्यानंतर ते राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायचा हट्ट केला. अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?, असा सवाल करत राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला जोरदार टोला लगावला.

तसेच, राणा विरुद्ध शिवेसना यांच्यात झालेल्या शाब्दीक युद्धावरुन, अटकेच्या प्रकरणावरुन, हिंदुत्त्वावरुन आणि लडाखमधील गोड भेटीवरुन शिवसेना आणि राणा दाम्पत्यावर टिका केली. शिवसेनेनं मोठा विरोध केला, राणा दाम्पत्यास मग अटक झाली. अटकेनंतर मधु इथं आणि चंद्र तिथं असं आपल्याला पाहिलं मिळाला. एवढा मोठं आंदोलन नाट्य झालं आणि ते तिथं लडाखमध्ये हातात हात घालून फिरतात. ते तिथं एकाच पंगतीत जेवतात, असे म्हणत राज ठाकरेंनी हे सगळे नाटकं करत असल्याचं म्हटलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या