Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्राद्वारे दिले 'हे' आदेश

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्राद्वारे दिले ‘हे’ आदेश

मुंबई |Mumbai

मनसचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी मनसैनिकांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात (Letter) पुन्हा एकदा भोंगा (Bhonga) या विषयाकडे लक्ष वेधले आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांनी (MNS Worker) भोंग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रत्येक घराघरात जाण्याचं आव्हान केले आहे.

- Advertisement -

राज ठाकरे रे (MNS President Raj Thackeray) यांनी एक पत्र लिहून आपला मुद्दा पुन्हा एकदा पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पत्रात भोंग्याचा (Bhonga) विषय कायमचा संपवायचा असल्याचेही त्यांनी सांगितलेय. हे पत्र प्रत्येक पदाधिकार्‍यांपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषेत पोहोचवले. ते पत्र मनसे सैनिकांना प्रत्येक घरात पोहचवण्याची विनंती केली आहे.

व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन (Movement) यशस्वी होणार नाही, असेही राज ठाकरे रे (MNS President Raj Thackeray) यांनी पत्रात म्हटले आहे. याआधीच आपल्या भाषणात हे स्पष्ट केलं होतं. मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा मनसेने हातात घेतल्यानंतर राज्याचे नव्हे तर देशाचं राजकारण ढवळून निघाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या