मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे ‘वर्षा’वर

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाला पाठिंबा देणार?
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे ‘वर्षा’वर

मुंबई | Mumbai

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत मनसे कुणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष लागलेले आहे.

याच दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत तसंच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभाच लोढा हे देखील उपस्थित होते. या भेटीचा फोटो देखील समोर आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com